Events
Upcoming Events

"चला मामाच्या घरी - २०२६"
🌿 अभ्यास वर्षभर आहेच, पण आता वेळ आहे निसर्गाच्या शाळेत जाण्याची! 🌿
वर्षभराच्या अभ्यासातून थोडी उसंत घेऊया आणि 'निसर्ग' या सर्वात मोठ्या गुरूच्या सानिध्यात काहीतरी नवीन शिकूया. तुमच्या मुलांसाठी घेऊन आलो आहोत एक अविस्मरणीय अनुभव...
🏡 "चला मामाच्या घरी" - ३ दिवसीय निवासी शिबिर! 🏡
मुलांच्या दंगा-मस्तीसोबतच संस्कार आणि शिस्त जपण्याची ही एक सुवर्णसंधी.
📍 स्थळ: बांदल व्हॅली, हाणबरवाडी, कोल्हापूर.
📅 दिनांक: ४,५ आणि ६ जून २०२६ .
✨ शिबिराची वैशिष्ट्ये:
निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव.खेळ आणि दंगा-मस्ती.
संस्कार आणि शिस्तीचे धडे.
📞 आजच नोंदणी करा:
९९७५२१५३१५ / ७८७५७०११८७

"माहेरवाशीण - २०२६"
🌸 सण माहेरपणाचा... सोहळा आनंदाचा! 🌸
"काही दिवस... फक्त तुमच्यासाठी! कारण तुम्हीही कोणाची तरी लाडकी माहेरवाशीण आहात."
लग्नानंतर सासरच्या जबाबदाऱ्या, मुलांचे शिक्षण आणि संसाराची धावपळ यामध्ये तुम्ही 'स्वतःला' कुठेतरी हरवून बसलात का? पुन्हा एकदा तेच बालपण, त्याच जुन्या मैत्रिणी आणि माहेरची ती हक्काची माया अनुभवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक खास संधी!
आंबा घाटाच्या थंड हवेत आणि लेमन रिसॉर्टच्या निसर्गरम्य सानिध्यात, या मे महिन्यात सजणार आहे 'माहेरवाशीण' २०२६ उन्हाळी शिबिर! 🌿✨
या ३ दिवसांच्या सोहळ्यात काय असेल खास?
• 🍽️ सुग्रास जेवणाचा बेत: आईच्या हाताच्या चवीची आठवण करून देणारी अस्सल माहेरची पंगत.
• 👭 नवीन मैत्रिणी: अनोळखी सखींसोबत मैत्रीचे नवे नाते गुंफण्याची संधी.
• 🌕चांदण्या रात्रीतील गप्पा: चांदण्यांच्या प्रकाशात मनातील सुखा-दुःखाच्या गोष्टी आणि मनमोकळा संवाद.
• 🌳 निसर्गाशी एकरूपता: रोजच्या धकाधकीच्या आयुष्यापासून दूर, निसर्गाच्या कुशीत विसावा.
• 🎁 माहेरची शिदोरी: निरोप घेताना सोबत नेण्यासाठी साठवणीतल्या आठवणींची अनमोल भेट.
झिम्मा-फुगडी, पारंपारिक खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेला हा सोहळा तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या माहेरच्या अंगणात घेऊन जाईल.
📅 तारीख: ४,५ ,६ मे आणि जून २०२६
📍 ठिकाण: लेमन रिसॉर्ट, अंबा (अंबा घाट)
📞 नावनोंदणीसाठी आजच संपर्क करा: ८९९९८७८५१९

शिवचाफा महोत्सव
चला, शिवविचारांचा वारसा पर्यावरणाच्या सहाय्याने पुढे नेऊया ...
चाफा रोप नोंदणीसाठी खालील बटणावर क्लिक करा.