







९ जुलै १९१० रोजी ब्रिटिशांच्या बोटीतून भर समुद्रामध्ये मार्सेलिस येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अत्यंत धाडसी उडीच्या स्मरणार्थ आणि स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी केलेला असीम त्याग मुलांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटा प्रयत्न म्हणून ‘सावली सोशल सर्कल’ गेल्या तीन वर्षांपासून शालेय मुलांसाठी राज्यस्तरीय सावरकर चषक जलतरण स्पर्धा आयोजित करत आहे. यावर्षी या स्पर्धा २६ व २७ जुलै रोजी इचलकरंजी महानगरपालिका संचलित कै. शंकरराव पुजारी जलतरण तलाव येथे पार पडल्या. या स्पर्धा श्री. अजय पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या.
सदर स्पर्धा कोल्हापूर जिल्हा ॲक्वाटिक असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य ॲक्वाटिक असोसिएशन यांच्या मान्यतेने घेण्यात आल्या.
संपूर्ण महाराष्ट्रातून २६० स्पर्धकांनी ११८ प्रकारात सहभाग नोंदवला.
संपूर्ण स्पर्धेचे विजेतेपद बेळगाव मधील आबा अकॅडमी (ABBA) तर उपविजेतेपद स्वीमर्स क्लब, बेळगाव यांनी पटकावले.
स्पर्धेसाठी इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. विजय राजापुरे, मर्दा फाउंडेशन चे श्री. श्यामजी मर्दा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
स्पर्धेचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा ॲक्वाटिक असोसिएशनचे अध्यक्ष श्री. आनंदराव माने यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, श्री. बाळासाहेब कलशेट्टी,
श्री. दीपक धोपेश्वरकर, श्री. किशोर देशपांडे, श्री. विजय जाधव, श्री. चंद्रशेखर फडणीस, श्री. विनय गोखले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्पर्धेच्या निमित्ताने सर्व स्पर्धकांना सावरकर समजावेत या दृष्टीने त्यांच्या जीवनावर आधारित मराठी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तिकाही प्रकाशित करून सर्व स्पर्धकांना त्याचे वाटप करण्यात आले.
या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी ॲक्वाटिक असोसिएशन चे ३५ कार्यकर्ते, तसेच सावली चे योगेश चव्हाण, चेतन वाघ, सौरभ शेवाळे, शिवानंद पुयम, तातू पुयम,ऋषिकेश देशपांडे,संग्राम कांबळे, गौतम थंगजम, आर्या देसाई, सखी गोखले, उर्वी जोशी, कुणाल सरावणे, शुभम ननवरे यांनी परिश्रम घेतले.