सावली केअर सेंटर गेल्या २० वर्षांपासून परावलंबित्व आलेल्या रुग्णांच्या सेवाकार्यात कार्यरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या आरोग्याच्या व्याख्येमध्ये शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्याचा समावेश केला आहे. शारीरिक व मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात सावली केअर सेंटर गेली अनेक वर्ष काम करतच आहे. आता सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने ‘सावली सोशल सर्कल’ च्या माध्यमातून काही उपक्रम संस्थेने हाती घेतले आहेत.
विविध विभाग
साहित्य कट्टा
जाणून घेऊया आपल्या आवडत्या साहित्याचे गूढ रहस्य स्वतः लेखकांच्या तोंडून
जरा विसावू या वळणावर
भावना फक्त मनात असतात सगळा काळ निघून गेल्यावर फक्त विचार मनात राहिले असतात. असे विचार खरोखर जगायची संधि पुन्हा मिळाली तर ?
आयुष्याच्या या वळणावर पुन्हा लहान होता आले तर ?
सावली केअर सेंटर आणि भारत विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने. दिव्यांग बंधू भगिनींना कृत्रिम अवयव प्रदान करण्यात येणार आहेत. त्यासाठीचे मोजणी करण्याचे शिबीर दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9.00 ते 2.00 यावेळी सावली केअर सेंटर पिरवाडी येथे होणार आहे.
याकरिता गरजू लोकांनी खाली दिलेल्या नंबरवर नाव नोंदणी करावी. ऋषिकेश- 7875701187 /
कुणाल- 9096959751
शिवचाफा महोत्सव
चला, शिवविचारांचा वारसा पर्यावरणाच्या सहाय्याने पुढे नेऊया ...
चाफा रोप नोंदणीसाठी खालील बटणावर क्लिक करा.